राजापूर:-फोटोग्राफर बंधू ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात असा हा रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी १७ ऑगस्ट रोजी होणारा रत्नागिरी जिल्ह्याचा जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफर मेळावा तसेच 'फोटो फेअर' इत्यादी कार्यक्रम यावर्षी राजापूर तालुका असोसिएशनच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिनांक १७ ऑगस्ट रोजी मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे.


  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून सिंधूरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण सामंत, माजी आमदार ॲड.हुस्नबानू खलीफे, राजापूरचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, मुंबई हायकोर्टाचे ॲड.मा. राकेश भाटकर, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदिप मालपेकर , राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ.अनामिका जाधव, राजापूर लांजा चे क्षेत्र प्रमुख राजू कुरूप , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अश्फाक हाजू, राजापूर तालुका बौद्धजन संघाचे तालुका अध्यक्ष महादेव गोठणकर ,इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


 सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ होणारा असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमातील फोटो फेअर मध्ये महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील फोटोग्राफी क्षेत्रातील विविध ब्रँड कंपनी आपले स्टॉल्स लावणार आहेत. त्यात प्रामुख्याने फोटो अल्बम, फोटो प्रिंट व्हरायटी,विविध कंपनीचे कॅमेरे, लेंसेस, प्रिंटर्स, फोटो आणि व्हिडिओची सॉफ्टवेअर, लाईट,विविध प्रकारचे फोटो फ्रेम्स, फोटोग्राफी क्षेत्रातील विविध उपकरणे व साहित्य असणार आहेत. 'डाटा रिकव्हरी' साठी खास स्टॉल असणार आहे. कॅमेरा लेन्स मोफत सर्व्हिसिंग कॅम्प देखील या ठिकाणी असणार आहे. शिवाय येणारे फोटोग्राफरची मोफत आरोग्य तपासणी देखील या ठिकाणी होणार आहे. फोटोग्राफर साठी राबवलेले विविध उपक्रम तसेच शासनाच्या विविध योजना यांची माहिती दिली जाणार आहे.


      विशेष म्हणजे महाराष्ट्रातील फोटोशॉपचे तज्ञ मा. प्रवीण बनसोडे सर यांचे वेडिंग अल्बम व पोस्टर डिझाईनिंग तसेच 'फोटोशॉप ए.आय टेक्नॉलॉजी' यावर प्रॅक्टिकल वर्कशॉप चे देखील आयोजन या ठिकाणी केले आहे. यासाठी एलईडी वॉल ची आयोजकांनी व्यवस्था खास केलेली आहे. बनसोडे सर यांचा पीएसडी बॅकग्राऊंड यासाठी देखील खास स्टॉल उपलब्ध असणार आहे. या स्टॉलसह इतर सर्व स्टॉलवर या दिवशी विशेष सवलत व डिस्काउंट ऑफर ठेवण्यात आलेले आहेत. या वर्कशॉपचे उद्घाटन शिवसेनेचे राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघाचे आमदार मा. डॉ.राजन साळवी यांच्या हस्ते होणार आहे.


 येणाऱ्या फोटोग्राफर्सना लकी ड्रॉ मार्फत हजारो रुपयांच्या बक्षीसांची लय लूट येथे करता येणार आहे. राजापूर मध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कोल्हापूर, कराड, रायगड व गोवा राज्यातूनही फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी दोनशे रुपये इतकी नाम मात्र प्रवेश फी असून यामध्ये येणाऱ्या सर्व फोटोग्राफर बंधूंची ची भोजनाची व्यवस्था करण्यात‌ आली आहे.तरी फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या सर्व फोटोग्राफर बंधूंना आवाहन करण्यात येते की आपणही या फोटो फेअरचा लाभ घ्यावा. 


 तसेच जागतिक छायाचित्रण दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन या वर्षीचा कार्यक्रम देखील नेहमीप्रमाणे यशस्वी करावा. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन तसेच राजापूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश खांबल, राजापूर - 9270738341, संदेश टिळेकर, राजापूर - 9370769436 यांचेशी संपर्क साधावा असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉटसॲप ग्रुपला व टेली ग्राम चॅनलला जॉईन करा

व्हॉट्सॲप ग्रुप : येथे क्लिक करा

टेलीग्राम चॅनल : येथे क्लिक करा


!!! आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!


                   ➧ अधिक माहितीसाठी संपर्क करा....➧

            🚸श्री फोटो स्टुडिओ / श्री मल्टिसर्विसेस,ओणी🚸

                 मो.नं- 9209825552, 8956960852

सरकारी नोकरीची जाहिरात, ऑनलाईन फॉर्म, निकाल, शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, सीईटी, सरकारी योजनांची माहिती आपल्या WhatsApp व Telegram वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व ग्रुप जॉईन करा.